पार्न व्हिडीओवर बंदी आणा—संतोष रावत

पार्न व्हिडीओवर बंदी आणा—संतोष रावत यांची मागणी 


सध्या देशात महिलांवर, बालीकांवर अत्याचाराच्या घटना सतत वाढत असल्यांने, सामाजीक स्वास्थ धोक्यात आले आहे.  या परिस्थितीला मोबाईलचे वाढते व्यसन आणि त्यातही अश्लिल व्हिडीओ, रिल्स, पार्न व्हिडीओ सारखे प्रकार कारणीभूत असून, महिलांच्या सुरक्षेसाठी अशा व्हिडीओवर सरकारने बंदी आणावी, असे व्हिडीओ, रिल्स समाजमाध्यमावर अपलोड करणार्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी केली आहे.
कलकत्ता, बदलापूर यांचेसह देशातील विविध भागात महिलांवर विशेषत: शाळकरी मुलींवर लैंगीक अत्याचार वाढत आहे.  अनेक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी या घृणास्पद प्रकारात सहभागी आहेत.  हे सारे समाजकंटक, मोबाईलच्या माध्यमातून व्हिडीओवर अश्लिल चाळे पाहत असून, त्यातूनच लैंगीक छळाच्या घटना वाढत असल्यांचे मत, श्री. रावत यांनी व्यक्त केले.
आज देशात महिला, मुली सुरक्षीत नसल्यांने पालक चिंतेत आहे, समाजातील वातावरण गढूळ होत चालले आहे.  विद्यार्थीनी असुरक्षीत वातावरणात शिक्षण घेत आहे, अशा परिस्थितीत निर्भय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची असून, सरकारने त्यादृष्टीने तातडीने पावले उचलावी, समाजानेही अशा घृणास्पद प्रकार करणार्यांवर बहिष्कार घालावा असे आवाहन रावत यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!