बैल धुवायला गेलेल्या २६ वर्षीय मुलाचा गाव तलावात बुडून मृत्यू

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर तालुक्यातील खडसंगी जवळ असलेल्या सोनेगाव (वन) या गावातील भा.ज.पा चे बुथ अध्यक्ष पांडुरंगजी सोनवाने यांचा एकुलता एक मुलगा रोशन सोनवाने हा दिनांक.२२/०८/२०२४ ला सकाळी ०८:०० वाजताच्या सुमारास बैलांना गावातील गाव तलावावर धुण्या करिता गेला असता.पाय घसरून खोल पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटना स्थळी त्या मुलाच्या बचावाकरीता दिवसभर सर्वोतोपरी प्रयत्न स्थानिक प्रशासनाने केले मात्र त्याचा शोध काही लागला नाही त्यामुळे त्याचा शोध घेण्याकरिता चंद्रपूर वरून बचाव पथकाला दुपारी पाचारण करून ०४:०० वाजताच्या सुमारास मृतदेह शोधण्यास यश आले. त्यानंतर चिमूर येथील उप जिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले.या अतिशय दुःखद घटनेने सोनेगाव वन व खडसंगी परिसरात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!