घोडाझरीच्या नवरगाव कालव्याला पडले भगदाड; शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान.


(निकृष्ट दर्जाचे काम व कालवा दुरुस्ती कडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना सोसावा लागतील नुकसानीचा तडका.)
यश कायरकर:
         घोडाझरी तलावांचा शेती सिंचनाचा कालवा धामणगाव (चक) या गावाजवळील अरुन मेश्राम यांचें शेताला लागुन असलेला नवरगाव कालव्याला मोठं भगदाड पडल्याने तलावातील पाणी शेतकऱ्यांचे शेतात घुसल्याने शेत पिकांचे नुकसान होतं असुन कालव्याचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने तलावातील. पाणी शेतकऱ्यांचे शेतातून पिकांचे नुकसान करित वाहत आहे. 
    नेहमी प्रमाणे ऑगस्ट महिन्यात घोडाझरी तलावाचा मुख्य कालवा धान पिकासाठी सोडला जातो. मात्र कालवा सोडण्याआधी कालव्याची जिर्न अवस्था दुरुस्ती न करता पाटबंधारे विभागाचे कालव्याद्वारे पाणी सोडले. परिनामी नवरगाव कालवा हा नागभिड तालुक्यातील धामणगाव (चक) या गावाजवळ जिर्न अवस्थेंत असल्याने फुटला आणी पाटबंधारे विभागांचे पुन्हा एकदा पितळ उघडे पडले. मात्र अधिकाऱ्यांचे निष्काळजीपणा मुळें शेतकऱ्यांचे व तलावांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. या कालव्यांची त्वरीत दुरुस्ती करुनच तलावांचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात यावे. व शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी योनोली मालचे सरपंच अमोल बावनकर, बिआरएसपी प्रमुख निकेश रामटेके यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!