ग्राम पंचायत सदस्यांनीच सरपंच उपसरपंच यांची संवर्ग विकास अधिकारी यांचेकडे केली तक्रार
चिमूर तालुक्यातील खडसंगी येथील येथील प्रकार
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - सोलर पॅनल विहीरिवरती लावणे व सोलर पॅनल बोरवेल वरती लावणे अशी दोन कामे आराखड्यात नमूद करून या कामांची प्रशासकीय मंजुरी मासिक सभेत घेण्यात आली.परंतु हे काम कशाप्रकारे करायचे यावर चर्चा करण्यात आली नसल्याने मासिक सभेत याबाबत ठराव सुद्धा घेण्यात आले नाही.अशा अवस्थेत सुद्धा सरपंच व उपसरपंच यांनी मिळून पदाचा गैरवापर करून टेंडर सार्वजनिक न करता स्वतः काम करायला सुरुवात केली.अशाप्रकारे नियम धाब्यावर ठेवून नियमांची पायमल्ली केली जात असेल तर शासकीय कायद्याचा अर्थ तरी काय ? म्हणून या संपूर्ण कामाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी तक्रार ग्राम पंचायत सदस्य खडसंगी यांनी संवर्ग अधिकारी पंचाय समिती चिमूर यांचेकडे केली आहे.चौकशी करून कारवाई न केल्यास उपोषणाला बसण्याचा ईशाराही देण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!