कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर - संचालक खुशाल लोडे मागणीला यश
सावली- तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने शेतातील बांधीत पाणी भरलेले होते. पंधरा ते वीस दिवस सतत पाऊस पडला होता. त्यामुळे पडणाऱ्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर येऊन शेतकऱ्याच्या शेतात पाणी साचले. नुकतीच धानाची रोपाची लागवड केली होती.रोवणी केलेल्या पिकाची नासाडी झाली. कुजलेली रोपे पुराच्या पाण्याने पार वाहून गेली. शेतकऱ्यांना रोवणी करण्याकरिता मोठी अडचण निर्माण झाली आहे.हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके प्रभावीत झाली. शेती व्यवसायच हातून जाईल की?काय ही व्यथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खुशाल लोडे यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून शासनाकडे मांडून पाठपुरावा केला.याची दखल घेत आज सायखेडा -पालेबारसा परिसरात कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली.नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद करीत थेट समक्ष पंचनामे केलेत. शेतकऱ्यांना समाधान होईल एवढी मदत मिळावी याकरिता प्रयत्न राहील असे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात मागील झालेल्या अति पावसाने शेतात पाणी तुडुंब भरलेले होते.शेतीलाही तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे धानाची रोपे, कपाशी व तूर पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. दुसऱ्यांदा रोवणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पऱ्याची व बिजाईची सुविधा उपलब्ध नाही. परिणामी संपूर्ण जमिनी पडीक राहणार की काय? असे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. अशा महा भयंकर नुकसानीत शेतकरी आत्महत्या सारख्या वळणावर पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही.करिता शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली म्हणून वरिष्ठ स्तरावर मागणी केली होती.अचानक शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कृषी विभागाचे अधिकारी सर्वेक्षण करून पंचनामे केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक खुशाल लोडेसह उद्धव कोरडे, माणिक कोरडे, राऊत, अमोल दाखोटे, भकतदास चुधरी गौरव कडस्कर, रामदास चौधरी, मनोहर पालपनकर, नरेश पालपनकर, विठ्ठल मंगर, दुमाजी मेश्राम, यशवंत वाघरे, आदेश वाघरे, शामराव वाघरे, तुळशीदास वाघरे, वामन मोरदेवे, लक्ष्यमन साखरे, माणिक साखरे, जीवन साखरे, आदीं शेकऱ्यांनी कृषी विभागाचे आभार मानले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!