चिमूर शहरातील वाल्मीक चौक येथे वाल्मिकी ऋषी यांची प्रतिमा स्थापनेसाठी केले भूमिपूजन

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर शहरातील वाल्मीक चौक येथे दिनांक.११/०८/२०२४ रविवार ला वाल्मिकी ऋषी यांची प्रतिमा स्थापनेसाठी भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉक्टर सतीश वारजूकर व युवक काँग्रेसचे महासचिव साईश सतीश वारजूकर यांच्या आर्थिक सहकार्याने चिमूर विधानसभा क्षेत्रात वाल्मीक चौक येथे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी चिमूर युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष ईशांत मामीडवार, संकेत हरदास, सुभाष मोहीनकर, सारंग मामीडवार, अमित सातपुते, रोशन रुईकर, गौराबाई मोहीनकर, किरण हेमके, सचिन मोहिनकर, दिगंबर मोहीनकर, भारत मोहीनकर, विनायक दिघोरे, प्रदीप पचारे, संतोष दिघोरे, चेतन चाचरे, गोलू मोहीनकर, गिरीधर मोहीनकर व आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!