बचत गटाच्या महीलांना आत्मनिर्भर होण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार - अहेतेशाम अली माजी नगराध्यक्ष

तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )         

वरोरा : - सावित्री लोक संचालित साधन केंद्र वरोरा येथे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन नगर भवन वरोरा येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाकरिता जिल्हा समन्वय अधिकारी काटोळे उपस्थित होते तसेच माजी नगराध्यक्ष वरोरा अहतेश्याम अली तसेच उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथील वंदना बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या तसेच ICICI BANK चे अधिकारी  मनोज कडू सेल्स माॅनेजर उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बचत गट महीलांना उद्योगाला चालना देऊन त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी सर्वतोपरी मदत करु असे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली म्हणाले सावित्री सी. एम. आर. सी चे व्यवस्थापक अमीत बानकर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.कार्यक्रमांमध्ये महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली असून आय. सी. आय.सी बँकेचे कर्ज घेणाऱ्या 16 लाख व 10 लाख कर्ज घेणाऱ्या गटांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी काठोडे सरांनी महिलांना व्यवसायाबाबत मार्गदर्शन करत पुढे चालून सर्व महिलांच्या हातामध्ये उद्योग यायला पाहिजे याबाबत फार्मर प्रोडूसर कंपनीमध्ये सर्व महिलांचा सहभाग असणे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या यांनी महिलांचे आरोग्याबाबत काळजी कशी घ्यायची स्वतःकडे लक्ष कसे द्यायची याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे नियोजन आणि  वार्षिक आर्थिक बजेट मांडणी - केंद्र व्यवस्थापक अमित एस. बानकर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता सूर्यवंशी आभार रंजु दुर्गे कार्यक्रमच्या यशस्विते करिता - केन्द्राची कार्यकारणी,गांव प्रतिनिधि, केन्द्र स्टाफ शितल बावने, सीमा धुर्वे,प्रतिभा कुंभारे,व सर्व प्रेरक स्टाफ यानी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!