श्रमिक पत्रकार संघाचा विजय सिद्धावार यांना शोधवार्ता पुरस्कार @ पब्लिक पंचनामातील "६ लाखाच्या खुर्चीसाठी ४ लाखाचा घोटाळा" बातमी अव्वल

 श्रमिक पत्रकार संघाचा विजय सिद्धावार यांना शोधवार्ता पुरस्कार 

@ पब्लिक पंचनामातील "६ लाखाच्या खुर्चीसाठी ४ लाखाचा घोटाळा" बातमी अव्वल 

मूल - चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचा शोध पत्रकारिता डिजीटल (पोर्टल) पुरस्कार येथिल जेष्ठ पत्रकार आणि पब्लिक पंचनामाचे मुख्य संपादक विजय सिदधावार यांना मिळाला. चंद्रपूर जिल्हयातील पत्रकारांसाठी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शोध पत्रकारिता डिजीटल (पोर्टल) विभागातील स्पर्धेमध्ये विजय सिदधावार यांनी सहभाग घेतला होता. त्यात त्यांच्या पब्लिक पंचनामा या पोर्टल मध्ये प्रसिदध झालेल्या बातमीची दखल घेण्यात आली. ते स्व. रामकुंवर सिंह यांच्या स्मृती प्रित्यर्थ के. के. सिंह यांचे कडून देण्यात येणा-या पुरस्काराचे मानकरी ठरले. रविवारी आयोजीत करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळयात विजय सिदधावार यांना आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण संमारंभ चंद्रपूर येथिल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मा.सा. कन्नमवार सभागृहात पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, प्रमूख मार्गदर्शक म्हणून हितवाद नागपूरचे वरिष्ठ उपसंपादक कार्तिक लोखंडे, आ. किशोर जोरगेवार, चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर, सचिव प्रविण बतकी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

       डिजीटल पोर्टल क्षेत्रामध्ये विजय सिद्धावार हे मागिल वीस वर्षांपासून काम करीत आहेत. आपल्या पब्लिक पंचनामा या पोर्टल मध्ये त्यांनी अनेक बातम्यांच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे. विविध क्षेत्रातील बातम्यांवर त्यानीं प्रकाश टाकला आहे. पब्लिक पंचनामा नावाने पोर्टल सुरु करून सिद्धावार यांनी डिजीटल क्षेत्रात पाऊल ठेवले. पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीमध्ये विजय सिद्धावार यांचे भरीव योगदान आहे. श्रमिक एल्गार या संघटनेच्या माध्यमातून सिद्धावार यांचे चळवळीतील कार्ये वाखाणण्याजोगे आहे. चळवळीच्या आणि पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. पोर्टल क्षेत्रातील वेब पत्रकारितेसाठी विजय सिद्धावार आजही अनेकांना मार्गदर्शन करीत आहेत. पब्लिक पंचनामा या पोर्टलवर त्यांनी फिस्कुटी ग्रामपंचायत्तीमधील भ्रष्टाचाराची मालिका लावून धरली होती. त्यातील "६ लाखाच्या खुर्चीसाठी ४ लाखाचा घोटाळा" या बातमीस शोधवार्ता पुरस्कार मिळाला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!