महागाई वाढल्याने आपले सरकार केंद्र चालक अडचणीत? सेवा शुल्क दर वाढविण्याची मागणी.

महागाई वाढल्याने आपले सरकार केंद्र चालक अडचणीत?

सेवा शुल्क दर वाढविण्याची मागणी.

मूल(प्रती) 

नागरिकांच्या सेवेसाठी शासनाकडून आपले सरकार केंद्र कार्यरत आहे. नागरिकांची कामे करताना शासकीय दराने आपले सरकार केंद्र चालकांना कामे करावी लागतात. परंतु गेल्या काही वर्षात इंटरनेट, कागद,शाई,वीजदर,मजुरी वाढल्याने शासकीय दरात कामे परवडत नसल्याने अनेक केंद्र चालक अडचणीत आले आहेत. 

शासनाच्या महाआयटी विभागाकडून आपले सरकार केंद्र सुरू आहे. या विभागांतर्गत नागरिकांची अनेक कामे सेवा शुल्क घेऊन करण्यात येत आहे. शासनाकडून नमूद केलेल्या दरानुसार केंद्र चालकांना नागरिकांची कामे करावी लागतात. आपले सरकार केंद्र कार्यरत असल्याने नागरिकांच्या वेळेची बचत व पैशाची बचत होत असते. आपले सरकार केंद्र अंतर्गत विहित कालावधीत अनेक महत्त्वपूर्ण शासकीय दाखले नागरिकांना उपलब्ध होत असतात.

गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. इंटरनेट, विज बिल, कागद, शाई, मजुरी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने केंद्र चालकांना शासनाने नेमून दिलेल्या दरात कामे परवडत नसल्याने आपले सरकार केंद्र चालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. 

तरी शासनाने याकडे गांभीर्याने बघून आपले सरकार सेवा शुल्क दरात वाढ करावी व आपले सरकार केंद्र संचालकांना आर्थिक स्थैर्य द्यावे अशी मागणी आपले सरकार सेवा केंद्र संचालकांनी केली आहे.


"महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक वस्तूंचे दर वाढले आहेत. आपले सरकार केंद्र संचालकांना सेवाशुल्क अत्यल्प असल्याने नागरिकांची कामे करताना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे शासनाने सेवाशुल्क दरात वाढ करावी."

पराग खोब्रागडे
आपले केंद्र संचालक, मुल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!