उमरी येथील गावाकऱ्यांना प्यावे लागते गढूळ पाणी

डॉ. सतिश वारजुकर यांनी घेतली गावकऱ्यांची  भेट

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर तालुक्यातील उमरी येथील प्रादेशिक पाणी पुरवठा नळ योजनेतून सर्व परिसरात पाणी पुरवठा केला जातो. मात्र या योजनेचे पाणी मागील ३ दिवसांपासून गढूळ येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. यामुळे मात्र त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पाऊस सतत सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे पाणिच पाणी झाले. पाणी स्वच्छ राहावे यासाठी म्हणून ब्लिचिंग पावडरचा वापर व्हायला हवा परंतु तसे केले जात नाही. यामुळे सामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात असल्याचे यावरून चित्र दिसून येत आहे. स्वतः डॉ. सतिश वारजूकर विधानसभा समनव्यक यांनी हातपंपाचे पाणी पिले असता ते पाणी पिण्या व वापरण्या योग्य नाही शुद्ध व पिण्यायोग्य पाणी लवकरात लवकर मिळावे अशी मागणी गावकऱ्यांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ.सतिश वारजुकर यांना करताच तात्काळ गावकऱ्यांसाठी टँकरने पाणी पाठवले व गावकऱ्यांनी डॉ. सतिश वारजूकर यांचे आभार मानले यावेळी प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष विनोद ढाकूनकर, तालुका उपाध्यक्ष तथा राजू चौधरी स्वीय सहाय्यक खासदार डॉ. नामदेवराव किरसाण ,नगर परिषद चिमूर माजी उपाध्यक्ष तुषार शिंदे, माजी नगरसेवक नितीन कटारे, मीडिया प्रमुख पप्पू शेख,मुरलीधर गायकवाड व आदी गावकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!