सादागड येथे सफारी गेटला मंजुरी - गावकऱ्यांमध्ये खळबळ
सावली - नव्याने सादागड येथील जंगल परिसरात पर्यटकांना सफारी करता यावी याकरीता गेट ला मंजुरी मिळाली आहे परंतु कोणतीही मागणी नसतांना व गेटचा गावातील नागरिकांवर विपरीत परिणाम होणार असल्याची भीती असल्याने खळबळ माजली आहे.
जिल्ह्यात वाघ, बिबट या हिंस्त्र प्राण्यांनी धुमाकूळ घातला असून ग्रामीणांचे जीवन मेटाकुटीस आले आहे. जंगलातील हिंस्त्र प्राणी गावात येऊन हल्ले करीत शेतपिकांचे, पाळीव जनावराचे नुकसान करीत आहेत. सावली शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर सादागड हे जंगलातील संपूर्ण आदिवासी लोकसंख्या असलेले गाव आहे. त्या परिसरात रिंगदेव तलाव असून चारगाव, भारपायली येथील शेतीला सिंचन होते व पाटबंधारे विभागाचे अखात्यारीत येते. या जंगलातून गावकरी पारंपारीक वनउपज मोह, तेंदूपाने गोळा करीत असतात, गुरे ढोरे चरत असतात. वाघ, बिबट, रानडुकरे यांच्यामुळे शेती करणेही अडचणीचे होत आहे. मात्र नुकतेच येथे सफारी गेट मंजूर झाल्याने आपल्या पारंपारीक हक्कावर निर्बंध येणार असल्याने गावात खळबळ माजली आहे. जवळ ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्प नसतांना किंवा कोणत्याही वाघ्र प्रकल्पचा संबंध नसतांना व परिसरातील गावाची कोणतीही मागणी नसतांना वन विभागाने सफारी गेट कसे मंजूर केले? असा सवाल उपस्थित होत आहे. श्रीमंत पर्यटकांसाठी आदिवासिंच्या हक्कावर गदा येण्याची शक्यता असल्याने खळबळ माजली आहे.
सफारी गेटचा अनुभव डोनी, फुलझरी परिसरात बघितला आहे. तिथे उपजिवेकेचे साधन असलेले बांबू काम, तेंदूपत्ता, मोह हा व्यवसाय बंद पडला आहे. त्यामुळे हीच परिस्थिती या भागात निर्माण होऊ शकते.
राजेश्वर वलकें
उपसरपंच ग्रामपंचायत चारगाव
सफारी गेट झाल्यास पर्यटन वाढल्याने गावातील नागरिकांना रोजगार मिळणार. निधी भरपूर प्रमाणात येईल.
विनोद धुर्वे
वनपरीक्षेत्र अधिकारी सावली



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!