खराब रस्त्यामुळे चिमूर वरून तळोधी जाणाऱ्या बसने मारली शेतात उडी

नागभिड तालुक्यातील घटना

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर आगाराची बस चिमूर वरून दुपारी १२:३० वाजता नेरी वैजापूर मार्गे तळोधी ला जात होती हि बस सोनापूर येणोली माल च्या मधोमध दुपारी ०१:०० वाजताच्या सुमारास खराब रस्त्यामुळे MH 40 Y 5267 क्रमांकाची बस पलटी झाल्याने या बस मध्ये १० ते १२ प्रवासी प्रवास करीत होते. यामधील कुठलेही प्रवासी जखमी झाले नसून सर्वच प्रवासी सुखरूप असून त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!