न.प.सक्सेना प्राथमिक शाळा पवनी येथे दहीहंडी उत्सव मोठया उत्साहात संपन्न

पवनी - प्रतिनिधी ( किशोर जुमळे )

पवनी : - स्थानिक न.प.सक्सेना प्राथमिक शाळेमध्ये जन्माष्टमीचे औचित्य साधून दहीहंडी उत्सव दिनांक.२८ ऑगस्ट ला साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी कृष्ण व राधा यांची वेशभूषा प्रतिकृतीने जनू सर्वांचे लक्ष वेधत होती पवनी नगरीत गोकुळ अवतरल्याचा भास होत होता. नंतर दहीहंडी फोड स्पर्धेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. व त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या हातांनी दहीहंडी फोडण्यात आली. विजेत्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेखर जिभकाटे, मुख्याध्यापक अनिल चेटुले, सहाय्यक शिक्षिका ज्योती हिंगे, सहाय्यक शिक्षक हेमंत सोनवले, तसेच शिक्षिका मोनिका रायपुरकर, एश्वर्या शिक्षिका यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी सर्व विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित तथा आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!