कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजणांचा लाभ शासकिय कार्यालयातुन देण्यात यावा - प्रशांत कोल्हे उप जिल्हा प्रमुख शिवसेना ( उ.बा.ठा )
उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमुर येथे बांधकाम कामगारांकरीता हितासाठी विविध साहीत्य आलेल्या किटचा लाभ मिळण्याकरीता लाभार्थी मोठ्या प्रमाणात अर्ज करीत आहे.या योजनेबाबत अनेक लाभार्थी यांना माहिती नसल्याने अर्ज कुठुन घ्यायचा कुठे दयायचा याबाबत अनभिज्ञ दिसुन येत आहे. अश्यातच चिमुर येथील भाजपच्या कार्यालयात लाभार्थ्यांची मोठी गर्दी बघण्यास मिळत आहे. जसे की भाजपच्या कार्यालयात बांधकाम कामगाराचे कार्यालय असल्याखेरीज गर्दी दिसुन येत आहे.व साहित्य हे फक्त आमदार यांचे मार्फत वाटप होणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे शासकिय योजनेचा लाभ हा कुठल्याही एका विशिष्ट पक्षाच्या कार्यालयातुन न होता त्या अर्जाची नमुने हे शासकिय कार्यालयातुनच जमा करून घेण्यात यावे तसेच बांधकाम कामगार हा नोंदणीकृतच आहे किंवा कसे याची खात्री करून नोंदणीकृत लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात यावा विविध ग्राम सेवक यांनी खात्री न करता बनावट कामगार असल्याचे दाखले देत असल्याचे दिसुन येत आले. त्यामुळे खरे बांधकाम लाभार्थी या योजनेपासुन वंचीत राहता कामा नये व बळ मिळणार नाही याबाबत योग्य ती कार्यवाही करून शासकिय विभागाच्या मार्फत बांधकाम लाभार्थ्यांचे आवेदने स्विकारण्यात यावे. तसेच त्याबाबत असलेले निकष सदर कार्यालयाच्या बाहेर प्रसिद्ध करण्यात यावे. याकरिता
प्रशांत कोल्हे उप जिल्हा प्रमुख शिवसेना ( उ.बा.ठा ) यांनी उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भैय्याजी कारेकार विभाग प्रमुख, रोशन जुमडे शहर सचिव, सुनील हिंगणकर प्रसिद्धी प्रमुख व आदींची उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!