संगणक क्षेत्रातील नोकरीचे आमिष आणि महिलेवर..
मुलीवर अतिप्रसंग करुण आरोपी फरार
सिंदेवाही : येथील २३ वर्षीय मुलीला संगणक क्षेत्रात नौकरी लावून देतो म्हणून उमरेड येथे नेऊन एका लॉजमध्ये अतिप्रसंग केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलीने आपल्या वडिलांना याची माहिती दिली. यावरून मुलीने सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव आकाश टेंभूर्णे (३५) रा. सिंदेवाही आहे. ही घटना बुधवार (दि. २८) च्या रात्रोची आहे.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादीचे वडील आपल्या परिवारासह सिंदेवाही येथे राहतात. बुधवार (दि. २८) रोजी त्यांची मुलगी ही घरी न आल्याने वडिलांनी सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी गुरुवार (दि. २९) रोजी अचानक मुलीचा फोन वडिलांना आला आणि मी उमरेड ला आहे मला येथून घेऊन जा. त्यावरून वडिलांनी गाडी करुण उमरेड ला गेले व मुलीला गुरुवार (दि. २९) रात्रो घरी आणले. घरी आल्यावर मुलीने आई वडिलांना आपल्यावर घड़लेली आपबीती सांगितली. यावरून मुलीने सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.
मुलीने सांगितल्यानुसार, बुधवार (दि. २८) रोजी सिंदेवाही येथील आकाश टेंभूर्णे (३५) हा संगणक क्षेत्रात तुला नौकरी लावून देतो असे सांगितले व उमरेड येथे एका लॉजमध्ये नेवून अतिप्रसंग केला. आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच याची माहिती वडिलांना देण्यात आली आणि वडिलांनी मुलीला उमरेड येथून घरी परत घवून आले. यावरून सिंदेवाही पोलिसांनी आकाश टेंभूर्णे (३५) याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली असुन आरोपी फरार आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजय राठोड करीत आहेत.



ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा