असोला मेंढा तलावावर जाण्यास तहसीलदारांचा बंदी आदेश - पर्यटकांमध्ये प्रशासनाप्रती नाराजी
सावली - स्वातंत्र्यदिन हा सुटीचा दिवस असल्याने पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी असोल्यावर जात असतात मात्र सावली तहसीलदाराने बंदी घातल्यामुळे तालुक्यातील पर्यटकांमध्ये तालुका प्रशासनाविरुद्ध नाराजी पसरली आहे.
सावली तालुक्यातील एकमेव इंग्रजकालीन तलाव म्हणून असोलामेंढा तलावाची ओळख आहे. निसर्गाच्या सानिध्यात विस्तीर्ण परिसरात हा तलाव पाथरीपासून काही अंतरावर आहे. या तलावाचा फाल (वेस्ट वेअर ) मधून पाणी निघत असतानाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी सावली, सिंदेवाही येथील पर्यटक गर्दी करीत असतात. आज स्वातंत्र्यदिन पार पडल्यानंतर पर्यटक दरवर्षी आनंद लुटत असतात मात्र शासनाने अतिवृष्टीचा कोणताही अलर्ट जारी केला नसतांना, कोणतीही अनुचित घटना घडली नसताना सावली तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी जाण्यास बंदी घातल्याने पर्यटकांची तालुका प्रशासनाविरुद्ध नाराजी आहे. मात्र सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाहीच्या बाजूने याच तलावात पर्यटक आनंद लुटत असल्याने सावली तालुक्यावरच बंदी का? असा प्रश्न पर्यटक विचारत आहेत.
असोला मेंढा तलावाकडे जाणारा पाथरी पेट्रोल पंपावरच पर्यटकांना रोखण्यात येत आहे. फालवर बंदी ठेवले तरी तलावपर्यंत तरी पर्यटकांना जाऊ जायला पाहिजे होते. या बंदीमुळे पाथरी येथील छोटे दुकानदार यांचा व्यवसायही बुडत आहे. सिंदेवाही तालुक्याला सूट व सावली तालुक्यात बंदी हा कसला हा दुजाभाव आहे.
प्रफुल तुम्मे
उपसरपंच पाथरी
सिंदेवाही तालुक्यातील पर्यटक गुंजेवाही बाजूने आनंद लुटताना..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!