भाजप ची फलके लावून विकास कामाचा नोंदविला निषेध

स्वातंत्र्य दिनी राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर युवक काँग्रेसचा आगळा वेगळा आंदोलन

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई हा मार्ग मागील १० वर्षांपासून कासव गतीने सुरू असून या महामार्गावर अनेक अपघात झाली यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला व याबतीत दखल घेत कोरोना च्या महामारी अगोदर चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी तसेच जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली अधिकारी यांची बैठक घेऊन महामार्गावरील अपघाताचा दैनंदिन आढावा घेत महामार्गाचे कंत्राटदार आणि पोलीस यांनी अपघाताचे घटनाक्रम नोंदवून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत ची समिती गठीत केली होती.परंतु याचा विरोध करीत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधिक्षक यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.त्यानंतर कधीही या समिती बाबत जिल्हाधिकारी यांनी चर्चा बैठक सुद्धा आयोजित केली नाही.अनेकदा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विविध कार्यक्रमात महामार्गावरील कामांमध्ये घोटाळा आढळल्यास त्या कंत्राटदाराला डोजर खाली चिरडल्या जाईल असे भाष्य केले. परंतु आज बघावे त्या क्षेत्रात भाजप ची सत्ता आणि त्यांनीच खेचून आणलेला निधी व त्यांचेच कंत्राटदार अशाप्रकारे विरोधकांकडुन नेहमीच खडेबोल आरोप केले जात असल्याचे दृश्य बघायला मिळत असून कुणालाही अजूनपर्यंत भ्रष्टाचारासंदर्भात डोजर खाली चिरडून टाकल्याचे चित्र बघावयास मिळाले नसल्याने चिमूर विधानसभा क्षेत्रात भाजप ची सत्ता असल्याने चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई चे काम रखडले असल्याचे दिसून येत आहे.आजही चिमूर वरोरा चंद्रपूर जातांना विद्यार्थी तसेच प्रवासी यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.पुढे सबका साथ सबका विकास म्हणून मिरविणारी सरकार याकडे लक्ष केंद्रित करेल आणि महामार्गाचे काम जलद गतीने पूर्णत्वास येईल या अनुषंगाने स्वातंत्र्य दिनी सरकारला याबाबतची माहिती मिळावी व जागृत करण्याच्या दृष्टीकोनातून भाजप च्या फलकांवर सबका साथ सबका विकास अशी लिहिलेली फलके युवक काँग्रेस चिमूर तर्फे राष्ट्रीय महामार्गावरील खड्यांच्या ठिकाणी ठेवून निषेध नोंदविण्यात आला.यावेळी साईश वारजूकर सरपंच शंकरपूर , अक्षय लांजेवार ,प्रशांत डवले ,शुभम पारखी ,अक्षय नागरीकर , संकेत हरिदास व अन्य युवा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!