पवनी तालुक्यातील नगर परिषद व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गणवेशापासून अजूनही वंचित
गटशिक्षण अधिकारी यांचे दुर्लक्ष
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वत्तीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्याबाबत दि.०८ जून, २०२३ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले.व पंचायत समिती ला शासनामार्फत कापड उपलब्ध झाले असून सुद्धा अजूनही गणवेश तयार करण्यात आलेला नाही. येणाऱ्या १५ ऑगस्ट ला गणवेश विना विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागेल अशी परिस्थिती आज तालुक्यात निर्माण झाली आहे. याकडे गट शिक्षण अधिकारी यांचे दुर्लक्ष असून लक्ष देण्याची गरज आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!