चूक प्रशासनाची - शेतकऱ्यास हेलपाटे @ मुल तहसीलदारांचा अफलातून आदेश
मुल - संगणकीय सातबारा अभिलेखात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चुकीची नोंद होते. चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी शेतकरी अर्ज करतो मात्र कोणतीही शहानिशा न करता चुकीचा आदेश करीत अर्जाच नस्तीबद्ध करण्याचा अफलातून प्रकार तहसीलदार मुल यांनी केल्याने शेतकऱ्याला विनाकारण हेलपाटे खावे लागत आहे.
तालुक्यातील जुनासुर्ला येथील युवक शेतकरी सतीश वाघू नसकुलवार याची शेतजमीन मौजा जुनासुर्ला येथे गट नं. 596/2 ही आहे. सदर गटाच्या संगणकीय सातबाऱ्यात प्रशासनाच्या चुकीमुळे सतीश वाघू नसकुलवार ऐवजी संतोष वाघू नसकुलवार झाले. याबाबत तलाठी जुनासुर्ला यांचेकडे गेल्यावर त्यांनी तहसील कार्यालयातून आदेश आणण्याचे सांगितले. शेतकऱ्याने सतीश नावाचे हस्तलिखित जुना सातबारा, नवीन संगणकीय सातबारा, आधार कार्ड सह अर्ज 21जुलै 2024 ला दिला. या अर्जावर कार्यवाही करताना तहसीलदार मुल यांनी राजपत्र करून घेण्याचा आदेश देत प्रकरण नस्तीबद्ध केले. सदर प्रकरणात चुकीचे नाव दुरुस्ती करण्याचे आदेश तलाठी यांना द्यायचे असतांना तहसीलदार यांनी विषय समजून न घेता राजपत्र करून सतीश हे पूर्वीचे नावच बदलवून घेण्याचा अफलातून आदेश दिल्याचे दिसते. यामुळे प्रशासनाने केलेली चूक दुरुस्तीसाठी शेतकऱ्याला हेलपाटे खावे लागत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!