शूरवी महिला महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन साजरा
शूरवी महिला महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन साजरा
दिनांक 9 ऑगस्ट ला जागतिक आदिवासी दिन शूरवी महिला महाविद्यालयात साजरा करण्यात आला. आदिवासी समाज मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्वांपासून कोसो दूर राहिल्या होत्या. या मूळ निवासी आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट 1994 या दिवशी International Day of Indigenous People अर्थात विश्व आदिवासी दिवस घोषित केला. भारतात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी आदिवासी दिवस साजरा केला जातो.
शूरवी महिला महाविद्यालय मूल येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमास शूरवी महिला महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्या हर्षा खरासे, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. श्री माता कन्यका सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. कापर्ती सर, संस्थेचे सचिव सुरावार सर याच्या मार्गदर्शनात जागतिक आदिवासी दिनाच्या सोहळा संपन्न झाला



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!