वरोरा,चिमूर 353 ई महामार्गाचे रखडलेल्या कामाबद्दल शेगावचे ठाणेदार यांची मध्यस्थी

कंपनी अधिकारी यांनी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यची दिली ग्वाही

तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्ग ३५३ ( ई ) या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम मागील कित्येक वर्षापासून रखडलेले आहे. त्यामुळे याआधी रस्ता बांधणीचे ठेका असलेली एस. आर. के. कंपनीला काळया यादीत टाकून उर्वरित काम के.सी.सी. कंपनीला देण्यात आले आहे. परंतु मागील महिना दोन महिन्यापासून शेगाव तसेच परिसरातील काम संबधित कंपनीने अर्धवट सोडून दिले होते. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे स्थानिक शेगाव मध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी  जीवघेणे खड्डे पडलेले असून, हीच परिस्थिती राळेगाव ते गुजगव्हाण फाटा, चारगाव नदीच्या पुलाजवळ, सालोरी व परसोडा इथे सुद्धा मोठमोठे खड्डे पडले असून सोबतच पुलाजवळ मोठ्या खाचा पडलेले आहेत. यावर कंपनीकडून कुठल्याच प्रकारचे उपाययोजना केल्या जात नसल्याने वारंवार कंपनी अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा ते याकडे लक्ष देत नव्हते त्यामुळे परिसरातील नागरिक तसेच रस्त्यावरून येणार जाणारे प्रवाशांमध्ये रोष व्यक्त होत होता. त्यामुळे हा प्रश्न शेगावचे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्याकडे नागरिकांनी बोलून दाखवला असता त्यांनी मध्यस्थी करून आज दिनांक ४ ऑगस्ट २०२४  ला पोलीस स्टेशन शेगाव येथे के.सी.सी. कंपनीचे अधिकारी व  परिसरातील नागरिक यांची एक मीटिंग लावून त्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कंपनीचे अधिकारी यांनी आपल्या समस्या मांडून उद्यापासून रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजवण्यात येईल अशी ग्वाही नागरिकांना दिली. त्यामुळे नागरिकांमध्ये असलेला रोष काही प्रमाणात शांत झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!