चिमूर तालुक्यात पुन्हा पट्टेदार वाघाने केले गंभीर जखमी
जखमींचा आकडा वाढत असून गावात माजली वाघाची दहशत
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर जवळील उरकुडपार , किटाडी , गरडापार , नवेगाव पेठ येथील ४ शेतकऱ्यास पट्टेदार वाघाने गंभीररित्या जखमी केले असून १) कवडु मनसाराम सावसागळे वय ५५ वर्षे राहणार किटाळी , (२) बालाजी नन्नावरे वय ५२ वर्षे राहणार गरडापार , (३) बाबाराव दडमल वय ४५ वर्षे राहणार उरकुडपार , (४) दामोधर नन्नावारे राहणार नवेगाव पेठ येथील असून जवळील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत माजली असल्याने बघ्यांची गर्दी घटनास्थळी धाव घेण्यास सुरुवात झाली आहे.वनविभाग व पोलीस प्रशासनाची यामुळे तारंबळ उडाली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!