मुल शहरात आढळला मोर शराटी पक्षी
मुल शहरात आढळला मोर शराटी पक्षी
मूल शहरात आज मोर शराटी पक्षी आढळल्याने अनेकांनी त्याचे कौतुकाने दर्शन घेतले.
दुर्मिळ समजला जाणारा मोर शराटी पक्षी आज सकाळी डॉक्टर बोकारे यांचे दवाखान्यावरील टाॅवर वर अनेकांना आढळून आला. इतरांपेक्षा वेगळा दिसत असल्याने अनेकांची नजर या पक्षाकडे गेली. हा पक्षी इथे कसा आला याबद्दलची चर्चा बघे हे करीत होते
वर्णन
साधारण ५० से. मी. आकाराचा मोर शराटी पक्षी दूर अंतरावरून काळा दिसत जराला तरी प्रत्यक्षात काळ्यासह हिरवट-तांबूस रंगाचा आहे. वीण काळातील नराचे रंग जास्त चमकदार असतात एरवी नर-मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी पाणथळ भागात थव्याने राहतात.
वास्तव्य/आढळस्थान
मोर शरटी हा भारताच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश उत्तरप्रदेश, गुजरात, ओडिशा, जसा मणिपुर पश्चिम बंगालदेश केरळ या राज्यात प्रामुख्याने तसेच नेपाल, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या आशियाई देशात हिवाळी पाहुणे म्हणून
युरोपमधून स्थलांतर करून येतात. दलदलीचे प्रदेश, सरोवरांच्या भागात आढळणारा हा पक्षी काळा अवाक, पांढरा अवाक तसेच सगळ्यांसह राहतो
उथळ पाण्यात चोच बुडवून एकटयाने आणि लहान-मोठण धल्याने हे पक्षी दिवसभर खाद्य शोधत फिरतात, सरडे, गोगलगाय, बेडूक, मासोळ्या, खेकडे वगैरे पाण्यात राहणारे जीव हे मोर शराटी पक्षाचे खाद्य आहे.
प्रजनन काळ
साधारणपणे गोव्हेंबर ते फेब्रुवारी-मार्च हा काळ चिमणा अवाक पक्ष्यांचा वीण काळ आहे. यांचे घरटे पाण्यात उभ्या असलेल्या किंवा जवळच्या झाडांवर, मोठ्या काटक्या वापरून केलेले असते. अशाच झाडांवर बहुधा बगळ्यांचे घरटे असते. अनेक पक्ष्याची मादी एकावेळी २ ते ४ हिस्वट निळया रंगाची अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिल्लांच्या संगोपनाची सर्व कामे नर-मादी मिळून करतात.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!