जांभुळघाट-पिंपळगाव रस्त्याच्या पुलावरून चार चाकी वाहन गेली वाहून
थोडक्यात पाच जण बचावले
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - चिमूर तालूक्यातील जांभुळघाट ते पिंपळगाव रस्त्या वरील पुलावरून दि.२८ जुलै २०२४ ला सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान कार वाहून गेल्याची घटना घडली.जिल्हात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली असून नदी व नाल्यांना पुर आला आहे.पुलावरून पाणी वाहात असतांनाही बेजबाबदारपणे कार चालक आपली वाहने टाकून जीव थोक्यात घालत आहेत.असाच पकार चिमूर जवळील पिंपळगाव याठिकाणी घडला कार घेऊन पिंपळगाव ईथुन नागपुर ला जायला निघाले असता पुलावरून पाणी वाहत होते तरी सुध्दा भीती न बाळगता चार चाकी वाहन टाकण्यात आली.परंतु पाण्याच्या वेग जास्त असल्याने वाहन पुलाखाली खेचल्या गेली व वाहन वाहून गेले अशातच एका झाडाला हि कार अडकल्याने वाहणात असलेले प्रवासी वाहानाचे काच फोडून बाहेर निघाले आणि सुदैवाने पाच जण बचावले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!