एक व्हॉटस्अप मेसेज अन् राज्यातील हजारो विद्यार्थाना दिलासा
एक व्हॉटस्अप मेसेज अन् राज्यातील हजारो विद्यार्थाना दिलासा
नामदार मुनगंटीवार यांची तत्परता
राज्यातील अभियांत्रिकीत प्रवेश घेवू इच्छिणार्या विद्यार्थ्यांची नोंदणी महाराष्ट्र सीईटी सेलने सुरू केली आहे. या नोंदणीची मुदत 24 जुलै होती, मात्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे तहसिल कार्यालयात झालेली गर्दी, त्यातही महसूल कर्मचार्यांचा बेमुदत संप यामुळे विद्यार्थाना आवश्यक महसूली दाखले काढण्यास अडचण निर्माण झाली. ही परिस्थिती राज्यभरातच होती. सेतूमधून आॅनलाईन केल्यानंतरही दाखले मिळत नसल्यांने पालकांची धावपळ सुरू होती. या परिस्थितीचे गांभीर्य एका पालकाने चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना एका व्हॉटसअप मेसेजद्वारे अवगत केले. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता, तातडीने उच्च शिक्षण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र देवून व व्यक्तीश: संपर्क करून, सीईटी नोंदणीची मुदत वाढविण्याची मागणी केली. विद्यार्थांचे दाखले प्राधान्याने देण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले. नामदार मुनगंटीवार यांचे मागणीला यश आले, सीईटी नोंदणीची तारीख 28 जुलै पर्यंत वाढविण्यात आली आणि महसूल कर्मचार्यांचा संप सुरू असतांनाही, प्रशासनाने विद्यार्थाचे उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, डोमीसाईल देणे सुरू केले.
एका साध्या व्हाट्सअप् मेसेजची मुनगंटीवार यांनी दखल घेतली आणि राज्यातील हजारो विद्यार्थानी सुटकेचा निश्वास सोडला.



याप्रमाणेच भाऊंनी एफ डी सी एम चे अधिकारी कर्मचारी यांचे सातवे वेतन आयोगाच्या थकबाकी बाबत विचार करून थकबाकी देण्यात यावी ही🙏🙏👏नम्र विनंती याचा शासनावर काही बोझ येणार नाही याची जाणीव आपणास आहे
उत्तर द्याहटवाचंद्रपूर शहरातील रस्त्याच्या गड्ड्याबाबत पक्के गड्डे बुजवण्यासाठी थोडा विचार करण्यात यावा ही अशी अपेक्ष
उत्तर द्याहटवा