आदिवासी नवीन रानतळोधी येथिल पुनर्वसन गाव हे अनेक सुविधांपासून पासून वंचित

तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - तालुक्यातील वरोरा चिमूर ३५३ ई या राष्ट्रीय महामार्गावर बसलेलं ताडोबा या व्याघ्र प्रकल्पा मधील रानतळोधी गावाचे पुनर्वसन मागील दोन वर्षा अगोदर शासनाकडून वरोरा तालुक्यातील परसोडा जवळ करण्यात आले आहे. परंतु शासनाने आजही आदिवासी कुटुंबांना सुविधा न दिल्यामुळे पावसाचा दिवसांमध्ये येथील जनतेला विविध समस्येचा सामना करावा लागत आहे. आदिवासी रानतळोधी जुन्या गावात जवळपास १५० घरे हे गाव ताडोबातील घनदाट जंगलामध्ये होते त्याचे सरकारने पुनर्वसन करत वरोरा ,चिमूर ३५३ ई या राष्ट्रीय मार्गावर स्थलांतर केले आहे ,नवीन गाव या ठिकाणी १३२ घरांची बांधकाम केले, आजही १८ घरे यांच्या मागण्या पूर्ण नं झाल्यामुळे जुन्या ठिकाणी वास्तव्याला आहे.
नवीन रानतळोधी येथे पावसाळ्यामध्ये नाल्याची सुविधा, पक्के रस्ते, शुद्ध पिण्याचे पाणी, घरांना मीटर, शेतकऱ्यांसाठी सौर कुंपण, अजून पर्यंत मिळाले नाही या ठिकाणी १९ बोरवेल शासनाकडून देण्यात आल्या फक्त पाच बोरवल सुरू आहे त्यातूनही पाणी गाळून जनतेला प्यावं लागत आहे,सगळीकडे पावसाळा सुरू असून आरोग्याच्या समस्या निर्माण झालेले आहे ,शासनाकडून १८ वर्ष ते ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येकी घराचे जागेसहित पाच एकर शेती तीन लाख ७५ हजार रुपये असा शासनाकडून लाभ त्यांना देण्यात आला आहे, आजही येथील शेतकऱ्यांना पांदण रस्ते शेतीला लागणारे सौर कुंपण मिळाले नाही. अनेक परिवाराला राशन कार्ड शासनाकडून मिळालेले  नसल्याने आजही ते स्वस्त धान्याच्या लाभपासून वंचित आहे, येथील घरांना मीटर सुद्धा अजून पर्यंत मिळाले नाही, अनेक शेतकऱ्यांना सातबारा मिळाला नसल्यामुळे अतिवृष्टी नुकसान भरपाई पासून सुद्धा शेतकरी वंचित आहे ,येथील अठरा वर्षापासून ते पंचवीस वर्षे पर्यंत येथील मुलांना अजून पर्यंत  शासनाच्या वोटिंग लिस्ट मध्ये नाव नसून नुसत्याच झालेल्या लोकसभेच्या त्यांना वंचित राहावे लागले समोर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांना वंचित राहावे लागणार कसा प्रश्न युवा वर्गामध्ये पडलेला आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधी, प्रशासनाने लवकरात लवकर समस्या मार्गी लावण्याची मागणी आदिवासी नवीन रानतळोधी येथील नागरिकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!