रोजगार भरती मेळावा २ नोव्हेंबर रोजी




चंद्रपूर ( प्रतिनिधी)-
   महिंद्रा अँड महिंद्रा या नामांकित कंपन्यांचे नागपूर आणि चंद्रपूर येथील वर्कशॉप साठी ट्रॅक्टर मेकॅनिक, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिशियन एन्ड इलेक्ट्रॉनिक्स  , मोटर मेकॅनिक व डिझेल मेकॅनिक हे  ट्रेड उत्तीर्ण असलेल्या आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांसाठी विशेष रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन एक्स -१४  अगस्ता मोटर्स, ( वांढरी फाटा) एम‌आयडीसी, घुग्घुस रोड चंद्रपूर येथे दि. २/११/२०२३ रोजी सकाळी ११ ते ३ या दरम्यान करण्यात आलेले आहे . वरील दिलेल्या व्यवसायाच्या कामाचा उमेदवारांना किमान तीन ते पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे . इच्छुक उमेदवारांनी याह मेळाव्याचा लाभ घ्यावा व मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांनी केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!