राष्ट्रवादीच्या प्रयत्नाने सुटली विद्युत दिव्यांची समस्या





 मूल शहरातील वार्ड क्रमांक 12 मधील श्री नागोसे ते श्री नखाते यांच्या घरादरम्यान  नगरपरिषद प्रशासनाने पोल तर उभे केले होते पण विद्युत दिवे न लावल्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. ही समस्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून वॉर्डातील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासना समोर मांडल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने तत्परता दाखवत लगेच दोन-तीन दिवसात विद्युत दिवे  लावल्यामुळे वार्डातील अंधार दूर झाले आहे. यासाठी वार्डातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!