तणनाशकाची फवारणी करून सोयाबीन पिके नष्ट ...



राळेगाव गावातील प्रकार...आरोपीवर कारवाईची मागणी...

वरोरा..जगदीश पेंदाम

तालुक्यातील शेगाव बू. येथून जवळच येत असलेल्या राळेगाव गावातील भूपाल महादेव शंभरकर यांच्या शेतामध्ये मानाने डोलत असलेल्या सोयाबीन पिकावर येथील एका इसमाने तणनाशकची फवारणी करून शेतामध्ये असलेले सोयाबीन पीक नष्ट केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे... 
 सविस्तर वृत्त असे की गेल्या 15 दिवसा अगोदर पिढीत शेतकरी भूपाल शंभरकर यांच्याशेता मध्ये असलेल्या पिकावर  राळेगाव येथीलच एका इसमाने यांच्या सहकार्याने जाणीवपूर्वक कुकर्म करून पीडित शेतकऱ्याच्या भर पिकावर तणनाशक फवारणी करून त्यांची सर्व पिके नष्ट केले त्यात पीडित शेतकरी शंभरकर यांचे फार मोठे नुकसान झाले असून याचा फार मोठा आर्थिक भुर्दंड हंगामात सहन करावा लागला आहे.. 
तेव्हा पीडित शेतकरी यांनी आपल्या हक्काच्या मागणीसाठी स्थानिक शेगाव बू येथील पोलीस स्टेशन गाठून झालेल्या सर्व प्रकारची तोंडी  तक्रार दाखल करून लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली. परंतु या गंभीर समस्याकडे पीडित शेतकऱ्याच्या यांच्या तक्रारीवर शेगाव पोलिसांनी कसलीही कारवाई केली नाही यात त्यांचे अंदाजे पाच लाखाची नुकसान झाले  असून ही शेती सर्वस्वी पीडित शेतकरी भूपाल शंभरकर यांच्या आजो वडिलोपर्जित असून या शेतीचा सर्व कागद पत्र तसेच सात बारा त्यांच्या वडिलांच्या नावाने आहे शिवाय या संदर्भात याचा खटला  मा. दिवाणी न्यायालय वरोरा येथे सुरू असून सर्व  जमिनीची वहिवाट करण्यासाठी वाहण्यासाठी कब्जा हा पीडित शेतकऱ्याकडे आहे यावर कोर्टाचा स्टे असुन जो पर्यंत न्यायालयाचा निकाल जाहीर होणार नाही तो पर्यंत ही शेत जमीन पीडित शेतकऱ्याच्या स्वाधीन असल्याचे पीडित शेतकऱ्यांनी सांगितले सहा एकर  शेतामध्ये असलेले सोयाबीन पिकावर जाणीव पूर्वक तननाशक  फवारणी करून यांची पीक नष्ट केले त्यामुळे कुकर्म करणाऱ्या दोषी आरोपीवर कडक कारवाई करून अटक करण्यात यावी तसेच झालेल्या नुकसानीची परतफेड म्हणून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी भूपाल महादेव शंभरकर यांनी केली आहे......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!