व्याहाड बूज. येथे स्मृतिदिनी नोटबुक व पेन वितरण - गुरनुले परिवाराचा स्तुत्य उपक्रम @ पारंपारीकतेला फाटा देत तेरवीला प्रबोधन कार्यक्रम घेतले होते

व्याहाड बूज. येथे स्मृतिदिनी नोटबुक व पेन वितरण - गुरनुले परिवाराचा स्तुत्य उपक्रम 
@ पारंपारीकतेला फाटा देत तेरवीला प्रबोधन कार्यक्रम घेतले होते

सावली प्रतिनिधी :- 
       सावली तालुक्यातील व्याहाड बुज. येथे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष स्व. तुळशीराम भिवाजी गुरनुले यांच्या द्वितीय स्मृतिदिनी मराठी उच्च प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक आणि पेन तर शिक्षकांना पुस्तकाचे वितरण गुरनुले परिवारातर्फे करण्यात आले . निधनाचे वेळेस तेरवीचा कार्यक्रम न करता प्रबोधन कार्यक्रम घेऊन पारंपरिक रितिरिवाजला फाटा दिला होता. अशा उपक्रमाची गरज समाजात असल्याने गुरनुले परिवाराचे कौतुक होत आहे.
        सावली तालुक्यातील व्याहाड बूज. या गावात गरीब घराण्यात जन्म घेऊन गरिबीचे चटके सहन करीत शिक्षण घेऊन जिल्हा परिषद शाळेत शिक्षक या पदावर कार्यरत होऊन कालांतराने मुख्याध्यापक पदावर कार्य करीत असताना जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव होणारे स्व. तुळशीराम गुरनुले यांचे 21 सप्टेंबर 2021 रोजी देहावसान झाले होते त्यांच्या स्मृतिदिनी दिनांक 21 सप्टेंबर रोजी व्याहाड बुज. येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे  शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक आणि पेनचे तर शिक्षक वृंदांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज , क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावरील पुस्तके भेट देण्यात आले .
        सदर कार्यक्रमात स्मृतीशेष तुळशीराम गुरनुले यांच्या जीवनावर माधव गुरनुले सर , धानोरकर सर , सुनील बोमनवार यांनी प्रकाश टाकला . या कार्यक्रमाला चंद्रपूर येथील पांडुरंग गावतुरे , प्रा. एस बी पटले , प्रा. अरुण धानोरकर ,  माजी सरपंच वंदना गुरनुले ,  माजी उपसरपंच सुनील बोमनवार , पत्रकार नासिर अन्सारी , पत्रकार ज्ञानेश्वर सिडाम , जयंत संगीतवार , मेहबूब पठाण , माजी उपसरपंच संजय चांदेकर , दीपक गद्देवार , स्वप्नील बोमनवार , नागोबा गुरनुले, प्रकाश गुरनुले , महादेव लेनगुरे , नीलकंठ गुरनुले ,  अतुल गुरनुले उपस्थित होते , या कार्यक्रमाचे संचालन अनिल  गुरनुले यांनी केले . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!