पुरस्काराचे शतक गाठणारे परमानंद तिराणिक सर...




वरोरा.. जगदीश पेंदाम

धर्मशास्त्र व तत्वज्ञानाची गाढे अभ्यासक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण हे विसाव्या शतकातील तुलनात्मक धर्म व तत्वज्ञानाचे प्रतिष्ठित विद्वानांपैकी एक होते स्वतंत्र भारताच्या राष्ट्रपतीपदी म्हणून विराजमान होणारे ते एकमेव शिक्षक होते. यांचा जन्मदिवस शिक्षकदिन ५ सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो. शिक्षक हा समाजाचा व उद्याच्या भविष्याचा निर्माण करणारा खरा आरसा आहे. म्हणून यांचाच शिक्षक दिनाचे औचित्य साधून आजही काही शिक्षक ज्ञानमंदिरात आपल्याला परिने ज्ञानमार्गाचा वाटसरू होवून शिक्षणाच्या व्यतिरिक्त समाजात जनजागरण करीत आहेत. त्यापैकीच एक अष्टपैलू व्यक्तीमत्व असणारे पुरस्कारांचे शतक गाठणारे चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव कलाशिक्षक परमानंद तिराणिक हे एक आदिवासी चंद्रपूर जिल्ह्यातील भूषण ठरले आहेत. त्यांना आतापर्यंत विविध क्षेत्रातील शंभर पेक्षा जास्त पुरस्काराने सन्मानित करून एक मानाचा तुरा रोहला गेला आहे. 'परमानंद तिराणिक यांनी' वारली चित्रकला' अभ्यासक्रमात यावी म्हणून माजी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके यांच्याकडे प्रस्ताव सादर करून पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यासाठी भाग पाडले. तसेच 'संविधानाची उद्देशिका' ही सुद्धा १ली ते १२ वी च्या पाठ्यपुस्तकात द्यायला हवी व ते त्या विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व कळावे यासाठी सुध्दा तिराणिक सरांनी पाठपुरावा करून महाराष्ट्रातील पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावे व ते विद्यार्थ्यांना उलगडता येतील हा उपक्रम सुध्दा असावा म्हणून २००८ पासून तो अमलात आला. परमानंद तिराणिक हे एक आदिवासी गरीब कुटुंबात जन्माला आलेले मात्र परिस्थितीने घेतलेली परिक्षा आणि आयुष्यात झालेला संघर्ष ह्या सर्व गोष्टींनी लोकांनी हिनवलेल्या मागास जातीचा शिक्का बसलेल्या या जिद्दीपोठी त्यांनी हा ठसा पुसुन काढून आदिवासींचा मुलगा थेट देश पातळीवरील 'वारली चित्रकलेसाठी' व्याख्यानासाठी पोहचतो हे आपणांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांचा प्रवास चित्रकार ते कवी असा असून त्यांच्या शब्द साहित्याच्या उपक्रमाची दखल घेऊन थेट गोवा राज्य सरकारने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या परिसरांत व आयुष्यांत इतर समाजाकडून घडलेल्या रंजक गोष्टींवर लिखान केले आहे. आदिवासींच्या मनातील प्रत्येक गोष्ट त्यांनी आपल्या लिखानाच्या माध्यमातून समाजासमोर  मांडली आहे. त्यांना आतापर्यंत विविध मान्यवरांच्या हस्ते शेकडो पुरस्कार बहाल करण्यात आले आहेत. त्यात चित्रपट क्षेत्रातील महानायक अमिताभ बच्चन, मराठी चित्रपट अभिनेते सचिन खेडकर, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, राघवेंद्र कडकोळ इत्यादी कलावंतांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला आहे. तर भारत सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी, मा. वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्तेही सन्मानित करण्यात आले आहेत...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!