जि.प.उच्च प्राथमिक शाळा सावरी (बिड) येथे शिक्षक दिन साजरा
विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनी शिक्षकांची भूमिका साकारली व शिक्षकांचे महत्व केले स्पष्ट
शिक्षक देतो आपल्या जीवनाला आकार,सदैव दूर करतो तो अज्ञानाचा अंधकार,कधी समजवतो तर कधी शब्दांना धार,शिकवे तो सर्वांना जीवन जगण्याचे सार
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे त्यांच्या महान कार्यांसाठी ओळखले जातात. भारतीय इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. ते एक शिक्षक, तत्त्वज्ञ, दूरदर्शी आणि समाजसुधारक होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांची गणना विद्वानांमध्ये होते. ते भारतीय संस्कृतीचे मार्गदर्शक होते. डॉ राधाकृष्णन यांनी विवेकानंद आणि वीर सावरकर यांना आपले आदर्श मानले . ते म्हणाले की, राष्ट्र उभारणीत देशातील शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. देशाच्या भविष्याचा पाया शिक्षकांमुळेच मजबूत होऊ शकतो.शिक्षक दिनी विद्यार्थी यांनी शिक्षकांचे म्हत्व सांगितले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप निखाडे , उपाध्यक्ष प्रदीप वाकडे, सदस्य कैलास वाकडे, संदीप ठवस,सौ.वर्षा कडसकर,जि.प.शाळाचे उच्च श्रीणे मुख्याध्यापक हिवज सर ,जेष्ठ शिक्षिक चौधरी सर ,सावसाकडे आत्राम सर ,मेश्राम सर सौ.आस्वले मॅडम,सौ.गुरुडे मॅडम शिक्षक दिनी उपस्थित होत्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!