पपईचे मूल्यवर्धित पदार्थ- कृषी महाविद्यालय मुलच्या कृषी कन्यांनी महिला बचत गट लोनवाही यांच्या साहाय्याने दिले प्रात्यक्षिक
मुल: ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही येथे पपई चा उपयोग करून मुलावर्धित पदार्थ कसे बनवता येईल याचे प्रात्यक्षिक कृषी महाविद्यालय मुल येथील कृषी कन्यांनी महिलांना दिले.
पपई ही आरोग्यास पोषक असून, त्यापासून टुटी फ्रुटी जाम, जेली, केक, सरबत, मार्मालेड, बनवता येतात. वरील पदार्थान पैकी टुटी फ्रुटी चे प्रात्यक्षिक कृषी कन्यांनी दिले.
बचत गटातील महिलांना काय सांगीतले?
टुटीफ्रुटी बनवण्यासाठी कच्च्या पपईची साल व बिया (असल्यास) वेगळ्या काढाव्यात. पिवळसर गराचे लहान आकाराचे चौकोनी तुकडे करावेत.
-सुरवातीला प्रति किलो गर तुकड्यांसाठी अर्धा लिटर पाण्यामध्ये पपईचे चिरलेले चौकोनी तुकडे ३० ते ४० मिनिटे ठेवावेत. त्यानंतर ते ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत. धुतलेल्या पपईच्या तुकडे पांढऱ्या मलमलच्या (धोतराचे कापड) कापडात बांधून ५ ते ६ मिनिटे वाफवून घ्यावेत. नंतर पपई तुकडे १५ मिनिटे ५ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या थंड पाण्यात ठेवावेत.
१ किलो साखरेमध्ये १ लिटर पाणी मिसळून त्याचा पाक करून घ्यावा. हा पाक गाळून त्यामध्ये पूर्णपणे पपई चौकोनी तुकडे १ दिवस भिजत ठेवावेत.
पपईच्या तुकड्यांमध्ये चांगल्या प्रकारे पाक शिरल्यानंतर ते तुकडे पाकातून काढून सूर्यप्रकाशात ४ ते ५ तास वाळवावेत. त्या नंतर तयार झालेली टुटीफ्रुटी ही निर्जंतूक केलेल्या काचेच्या बरणीत भरून ठेवावी. हा उपक्रम योग्य रीतीने पार पाडण्याकरिता कृषी कन्यांनी उद्यानविद्याशास्त्र विशेषज्ञ डॉ स्वप्निल देशमुख यांची सहायता घेतली. या प्रात्यक्षिका वेळी महिला बचत गट अध्यक्ष प्रभा कोसरे सचिव श्रीमती कांचन बोरकर व बचत गटातील इतर महिलांची उपस्थिती होती.
हा उपक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ विष्णुकांत टेकाळे,
कार्यक्रम अधिकारी डॉ खुशाल राठोड, यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महाविद्यालय मुल येथे सातव्या सत्रात शिकत असलेल्या कृषीकन्या, मोनिका कीन्हेकर, मृण्मयी निमसत्कर,अंकीता चंदनखेडे, स्वेता वासेकार , प्राची वानखेडे यांनी यांनी राबविला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!