योगेश मेश्राम यांच्या वाढदिवसा निमित्त मालेवाडा येथील विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन चे वाटप
तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमूर : - चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे योगेश मेश्राम यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेच्या मुलांना नोटबुक व पेन चे वाटप करण्यात आले. दिनांक.१९ सप्टेंबर ला सामाजिक कार्यकर्ते योगेश कवडुजी मेश्राम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त महाकारुणिक तथागत बुद्ध, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करून विद्यार्थ्यांना पेन व नोटबुक चे वितरण केले. योगेश मेश्राम यांनी ज्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला तो इतरांसाठी प्रेरणा देणारा आहे हे मात्र नक्की. वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस व आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. वाढदिवस प्रत्येक जण आप - आपल्या पद्धतीने साजरा करत असतात. वाढदिवसाच्या निमित्ताने योगेश मेश्राम यांनी आपल्या क्षमतेनुसार शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक, पेनाचे दान करत समाजाप्रती एक आदर्श उभा केला आहे. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना ते म्हणाले की, वाढदिवसाला अनाठायी खर्च करण्यापेक्षा समाजाप्रती प्रेम भावना निर्माण करण्याचा व आपल्या क्षमतेनुसार दान करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. यावेळी आयु. कुमेश्वर पाटील, दुर्योधन गजभिये, नीलकंठ बांबोडे, आशिक रामटेके, प्रदीप मेश्राम, अंकित शेंडे, प्रवीण दुमाने, भीमाबाई गजभिये, आदी मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले. उपस्थित महिला, युवक व शालेय विद्यार्थी सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!