जिल्ह्यात पुन्हा एक वाघीण मृत,फिस्कुटी येथे शेतात आढळली.



(पोंभुर्णा वनपरिक्षेत्रातील घटना, दोन ते अडीच वर्षांचे मृत वाघीनीचे वय.)
(काही दिवसापूर्वी बल्हारशाह वनपरिक्षेत्रात वाघाचे दोन पिल्ले मृता अवस्थेत, व एक बछडा जखमी अवस्थेत आढळून आले होते.)
यश कायरकर,
        पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या फीस्कुटी  येथे जगदिश गावतुरे रा. चंद्रपूर  यांच्या शेतात आज एक वाघीण मृत अवस्थेत आढळुन आली.
      सविस्तर वृत्त,  फिस्कुटी निवासी पपलु वामन शेंडे हे जगदिश गावतुरे रा. चंद्रपूर यांची शेती करतात.  तेआज सकाळी ७:३० चे दरम्यान महीला मजुर घेऊन धान शेतात नींदन करण्यासाठी  शेतात गेले असता त्यांना तीथे एक वाघ मृतावस्थेत आढळुन आला,  त्यांनी ही माहिती तात्काळ शेतमालकाला दिली. शेतमालकाने फीस्कुटी चे सरपंच मार्फत ही माहिती पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिली.


       सदर घटनेची माहीती मिळताच वन परीर्क्षेत्र अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. व सदर घटनेची पाहानी केली असता मृत वाघ ही दोन ते अडीच वर्षाची वाघीण असल्याचे निदर्शनास आले.
(विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी बल्हारशाह वनपरिक्षेत्रात वाघाच्या दोन पिल्लांचा मृता अवस्थेत, व एक बछडा जखमी अवस्थेत आढळून आले होते.)
सदर वाघिणीचा मृत्यू हा एका दिवसापूर्वी झाला असल्याचे प्रथम दर्शी निदर्शनास येते. मात्र या घटनेसंबंधात गाव परिसरात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे.
    तसेच मृत वाघाचे नखे, मिशा, दात इत्यादी अवयव शाबूत असल्याचे असल्याबाबत शहानिशा करून त्याला चंद्रपुर च्या ट्रान्झीट ट्रीटमेंट सेंटर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले व पशु वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन करून त्याचे मृतदेह तिथेच दहन करण्यात आले.
मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच सांगता येणार असे वनपरिक्षेत्र अधिकारी फनिंद्र गादेवार यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!