आयुक्त (शिक्षण) व शिक्षण संचालक यांना महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने निवेदन
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने जी.एस.मंगनाळे, राज्य उपाध्यक्ष(नांदेड) यांनी नुकतेच 12 सप्टेंबर 2023 ला पुणे येथे शालेय शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक कार्यालयाला भेट देत संबंधितांना संघटनेची निवेदने सादर केली यावेळी शरद गोसावी शिक्षण संचालक पुणे यांना तसेच जगदाळे साहेब, उप आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांना भेटून निवेदन दिले. यामध्ये सर्व प्रकारची शाळाबाह्य कामे त्वरित कमी करा अन्यथा संघटना व्हाट्सअप्प ग्रुप मधून लेफ्ट होणे व प्रभार सोडणे आंदोलन करणार.जिल्हा शिक्षक पुरस्कार वेतनवाढ बाबत होत असलेली वसुली थांबवावी.शालार्थ मधील मागील 4 महिन्यापासून बंद केलेल्या टॅब सुरू कराव्यात. विद्यार्थी शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवा.कंत्राटी पद्धतीने भरती रद्द करा, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या रिक्त जागा भरा आदी विषयांचा समावेश मागण्यांच्या निवेदनावर राज्याध्यक्ष प्रसाद पाटील राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य उपाध्यक्ष जी.एस.मंगनाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.अशी माहिती जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार, जिल्हा सरचिटणीस सुरेश गिलोरकर, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, जिल्हा कोषाध्यक्ष सुनिल कोहपरे यांनी दिल्याचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी एका पत्रान्वये कळविले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!