सावरगाव येथे युवकाला ट्रकने चिरडले, एक ठार दोन जख्मी.
सावरगाव येथे युवकाला ट्रकने चिरडले
( अपघातात एक युवक ठार दोन जख्मी)
यश कायरकर,( तालुका प्रतिनिधी);
नागभीड - मुल रोड वरती सावरगाव येथील इस्सार पेट्रोल पंप च्या सामने नागपूरकडून - सुरजागड कडे जाणाऱ्या व लोह खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने दोन युवक जखमी झाले तर ट्रकच्या चाकाखाली येऊन एक युवक ठार झाल्याची घटना घडली.
सविस्तार वृत्त असे आहे की, सावरगाव येथील कोळी समाजाचे चार युवक आज रात्री गावाबाहेर नाल्यामध्ये पाण्यात जाळ लावून पकडलेल्या मासोळ्या आणायला पायदळ जाताना रात्री 10;30 वाजता मागच्या बाजूने येणार्या व नागपूर कडून - सुरजागड कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक MH - 49 -AT - 7255 ने धडक दिल्यामुळे एकनाथ गुलाब भाणारकर, वय 34 वर्ष, ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाल्याची घटना घडली. तर नागेश जीवतू भानरकर,व महादेव बंडू मांढरे,हे जखमी झाले. मृतक युवक हा परिवारातील आई-वडिलांसाठी एकटाच मुलगा असल्यामुळे परिवारावर मोठे दुःखाचे डोंगर कोसळले असून या घटनेमुळे गावात शोक कडा पसरलेली आहे.
ट्रक चालक हा ट्रक घेऊन सामोरील शिंदेवाही येथे पोलीस स्टेशन मध्ये गेला व तेथे त्याने आत्म समर्पण केले.
तळोधी पोलीस स्टेशन चे ठाणेदार मंगेश भोयर यांनी ट्रक ताब्यात घेऊन ठाण्यात लावले व ट्रक चालकास व वाहकास अटक केली. व समोरील तपास पोलीस स्टेशनचे ठाणेदार भोयर यांच्या मार्गदर्शनात, पी. एस. आय. गोवर्धन, साहाय्यक फौजदार सुधाकर भानारकर करित आहेत.
मात्र सावरगाव परिसरामध्ये सतत होणाऱ्या या अपघातामध्ये गेल्या नऊ महिन्यांचा कालावधी मध्ये आजपर्यंत सावरगाव येथील चार युवक ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे गावातील लोकांनी, या महामार्गावर रस्ता बांधकाम विभागाने गावाजवळ गतिरोधक बनवावे असे मागणी केलेली आहे. एकदा तर गावामध्ये बस स्थानकावर झालेल्या अपघातानंतर गावातील संतप्त झालेल्या जमावाने सलग दोन ते तीन तास चक्काजाम करून ठेवण्यात आलेला होता.
या सतत होणाऱ्या घटनेमुळे सावरगाव ग्रामपंचायत ने सुद्धा ठराव घेऊन रस्ता बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) या रस्त्यावर गतिरोधक बनवण्यात यावे म्हणून मागणी केली आहे. मात्र त्याकडे पी.डब्ल्यू.डी ने दुर्लक्ष केल्याने हा अशा घटना घडत आहेत.




नागपूर पूरग्रस्तांसाठी नाम फाउंडेशनची मदत
उत्तर द्याहटवाhttps://khabarbat.in/news/am