योगेश लोखंडेची आत्महत्या नसून हत्या वडील सिताराम लोखंडे यांचा आरोप

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - पवनी येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक योगेश सिताराम लोखंडे यांची हत्या करण्यात आली असून ती आत्महत्या नाही व याची गुप्तचर पोलीस विभागातर्फे चौकशी व्हावी अशी मागणी सिताराम लोखंडे व त्यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ ला योगेश लोखंडे हा मोटरसायकल फॅशन प्लस घेऊन घरून निघून गेला त्यानंतर तो रात्रीला घरी आला नाही त्याचा मोबाईल स्विच ऑफ होता त्यांच्या कुटुंबीयांनी दोन दिवस  इतरत्र शोध घेतला परंतु त्याचा पत्ता लागला नाही त्यामुळे कुटुंबीयांनी २८ फेब्रुवारी २०२३ ला पवनी पोलीस स्टेशन येथे योगेश बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. ७ एप्रिल २०२३ ला ४० दिवसांनी सकाळी १० वाजेच्या दरम्यान त्याचा मृतदेह पवनी शहरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या इटगाव शिवारात आढळून आले. त्यावेळी त्याच्याजवळ तिथे त्याची मोटर सायकल नव्हती. त्यांनी नेलेली मोटर सायकल २१ दिवसाने घटना स्थळापासून अवघ्या सातशे मीटर वर मृतदेहाच्या विरुद्ध बाजूला आढळून आली. शेत शिवारात मिळालेली मोटर सायकल कशी आली असावी मृतदेह मिळाल्यानंतर कोणीतरी तिथे मोटार सायकल आणून ठेवली असा संशय पत्रकार परिषदेमध्ये सिताराम लोखंडे व त्यांच्या कुटुंबियांनी केला. योगेश लोखंडे यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत असताना देखील त्यांची पत्नी चित्रा लोखंडे यांनी यासंदर्भामध्ये योग्य ते पाऊल उचलले नाही असा संशय लोखंडे यांच्या कुटुंबीयांनी केला चित्रा लोखंडे यांच्यावर कुटुंबीयांचा पूर्णपणे संशय असल्याचेही त्यांनी  पत्र परिषदेत जाहीर केले. योगेश लोखंडे व चित्रा लोखंडे यांची नेहमी खटके उडायचे व यातूनच त्यांचा खून करण्यात आला असावा असाही आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. योगेश लोखंडे यांची आत्महत्या नसून ती हत्याच करण्यात आली आहे व याची सखोल चौकशी गुप्तचर विभागातर्फे करण्यात यावी व योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी  सीताराम विठोबा लोखंडे व त्यांच्या कुटुंबियांनी केली असून  योग्य न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा त्यांनी पत्रकार परिषद मध्ये दिला. या पत्रकार परिषदेला मृतक योगेश लोखंडे यांचे वडील सिताराम विठोबा लोखंडे त्यांचे भाऊ जगदीश सिताराम लोखंडे अरविंद सिताराम लोखंडे  उपस्थित होते.

...................................................

मृतक योगेश लोखंडे यांच्या खुनाच्या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली जलद गतीने तपास सुरू असून सखोल चौकशी सुरू आहे या संदर्भामध्ये पोलीस विभाग प्रयत्नशील असून लवकरात लवकर याचा शोध घेण्यात येईल.

नरेंद्र निस्वादे 
पोलीस निरीक्षक 
पोलीस स्टेशन पवनी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!