२१ मे रोजी छ. शाहु महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे भव्य आयोजन



चंद्रपूर (प्रतिनिधी)- 
   शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर आणि कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र  यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे जिल्हास्तरीय आयोजन येत्या २१ मे रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात (पाण्याची टाकी जवळ) करण्यात आलेले आहे. 
     या शिबिरांमध्ये दहावी आणि बारावीनंतर शिक्षणाच्या संधी, महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी,  व्यक्तिमत्व विकास व  मुलाखतीचे तंत्र , शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व  कर्ज पुरवठा करणाऱ्या  वित्तीय संस्थाचे प्रतिनिधी मार्गदर्शन करणार  आहे. रोजगार आणि स्वयंरोजगार करण्यासाठी शासनाच्या विविध योजना, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना  नोकरीच्या विविध संधी विषयी माहिती दिली जाणार आहे.  शिबिरस्थळी माहितीपर प्रदर्शिनी लावण्यात येत असून त्यात विविध विभागांच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहेत. तरी  जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आणि पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा   प्राचार्य रवींद्र मेहेंदळे  यांनी केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!