रकमेची अफरातफर करणाऱ्यावर अटकेची कार्यवाही करा अन्याय निवारण समीतीची मागणी
उपविभागीय अधिकारी चिमूर यांना दिले निवेदन
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर तालुक्यात गाजत असलेल्या राष्ट्रसंत नागरी सहकारी पतसंस्था मर्या , चिमूर र.नं. ८०३ मध्ये रकमेची अफरातफर करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी अन्याय निवारण समितीव्दारे साखळी उपोषणाला बसले आहे . त्या उपोषण स्थळाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक सतिश वारजुकर यांनी भेट दिली.राष्ट्रसंत तुकडोजी नागरी पतसंस्था मर्या , चिमूर र.नं.८०३ या संस्थेचे दिनांक. ०१/०४/२०१२ ते दिनांक ३१/०३/२०२१ या ९ वर्षाच्या कालावधीमध्ये रू.७,६६,९०,५१० रकमेची अफरातफर करण्यात आली असुन पोलीस स्टेशन चिमूर येथे ३०/०९/२०२२ ला तक्रार दाखल केली होती. जवळपास ६ महिन्याचा कालावधी लोटूनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही .त्यामुळे नाईलाजस्तव अन्याय निवारण समीती चिमूर व्दारे साखळी उपोषणाला बसले आहेत. या साखळी उपोषण स्थळाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसंचे समन्वयक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश सतीश वारजुकर यांनी भेट दिली व यांच्या उपस्थित दि.१६/०५/२०२३ ला उपविभागीय अधिकारी चिमूर यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजयजी गावंडे पाटील, ग्राम पंचायत सरपंच प्रशांत कोल्हे, किशोरजी अंबादे, अविनाश रासेकर, अमर कारमेंगे, उद्धवराव देकाटे, बालू सातपुते, प्रवीण वाघे, प्रवीण बारापात्रे,नाजमा शेख, नसीमा शेख,सुनीता कांबडी, रेखाताई अंबादे, भारती दडमल,मोरेश्वर बाहुरे, बाबल दुर्गे, बंडू निखाते,महेश वनकर,व आदी उपस्थीत होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!