लाकडी पांढऱ्या काळवीट हरणाच्या संख्येमध्ये वाढ...
पर्यावरण प्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण...
वरोरा.... जगदीश पेंदाम
नुसतीच बौद्ध पौर्णिमेला सगळीकडे रात्रीच्या सुमारास वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली असून जंगलातील सर्वच प्राण्यांची गणना वन विभागाकडून करण्यात आली आहे...
एकीकडे ताडोबामध्ये काळे रंगाच्या बिबट्याच्या प्रजातीमध्ये वाढ झाली असून पर्यटकांमध्ये आनंदाचा विषय बनला आहे... परंतु चिमूर तालुक्यामध्ये सध्या तरी लाकडी पांढऱ्या काळवीट हरणाच्या नुकताच झुंड पर्यावरण प्रेमींना शंकरपूर आंबोली रस्त्यावर असलेल्या झुडपे जंगलात सकाळी पाहायला मिळाला असून पर्यावरण प्रेमी मध्ये आनंदाच्या विषय बनला आहे....
चिमूर तालुक्यातील शंकरपूर आंबोली रस्त्यालगत असलेल्या रस्त्यावर झुडपे जंगल असून नेहमीच्या या ठिकाणी वन्यप्राणी दिसत असतात परंतु या ठिकाणी सध्या दहा ते बारा लाकडी पांढऱ्या रंगाचे काळवीट हरणाच्या झुंड दिसल्याने वनविभागाने लक्ष देऊन जास्त प्रमाणात याचे संगोपन करण्याची गरज निर्माण झाली आहे, प्राण्यांचा शरीरात वातावरणातील बदलामुळे , जेनेटिकारणने रंग बदलत असून दिवसेंदिवस प्राण्यांच्या रंगात बदल होत चाललेले आहे व लाकडी पांढऱ्या रंगाच्या प्राण्यांच्या संख्येमध्ये वाढ दिसत आहे, अश्या दुर्बल दिसणाऱ्या झाडे,पक्षी,प्राण्यांकडे लक्ष देण्याची महत्त्वाची बाब निर्माण झाली......



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!