कंत्राटदाराच्या अवैध मुरम उत्खननाने विद्युत पोल पडण्याच्या तयारीत

अपघात होण्याची दाट शक्यता

महसुल विभाग व महावितरणा कडून मुरूम उत्खनन करणाऱ्या कंत्राटदारा वर कार्यवाही करण्याची गावकऱ्याची मागणी

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - तालुक्यात महसुल विभाग व लोकप्रतिनिधी च्या आर्शिवादाने चिमुर तालूक्यात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिजाचे उत्खनन सुरू आहे. जांभुळघाट ते बोळधा रोड चे काम सुरू असताना कंत्रातदाराने रोडच्या बाजूलाच अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करून रोड वर मुरूम मोठ्या प्रमाणात टाकण्याचे काम कंत्राटदार यांचे कडून करण्यात आले.महसुल विभागाच्या आर्शिवादा ने या मुरुमाचे उत्खनन सुरू असून चिमुर तालूक्यात कुठलाही महसूल अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने याबाबतची महसुल विभागाला माहीती मिळून शुध्दा अधिकारी याकडे लक्ष देण्यास टाळा-टाळ करताना दिसत आहे.याचे कारण कंत्राटदार हे मोठ्या लोकप्रतिनिधी च्या जवळचे असल्याने यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी कोणत्याही विभागाचे अधिकारी व कर्मचारी हिम्मत दाखवताना दिसत नाही. मुरुमा चे अवैध उत्खनन हे नियम बाह्य असुन या मुळे विद्युत पोल कधीही पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.महावितरण कड़ून शुध्दा कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी.अशी गावकऱ्या कडून मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!