अवकाळी पावसामुळे पोकलँड नदीत,तर चारगाव धरण पुलावर ट्रक फसल्याने वरोरा चिमुर मार्गाची वाहतूक ठप्प...
वरोरा.. जगदीश पेंदाम
जिल्ह्यात एक महिन्यापासून सगळीकडे अवकाळी पाऊस सुरू असून काल झालेल्या अवकाळी पावसामुळे वाहतुकीला सुद्धा आळा बसला आहे चारगाव धरण पुलाजवळ ट्रक फसल्याने चिमूर ते वरोरा मार्गाची दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प पडलेली आहे, सगळीकडे पाणीसाठा उपलब्ध झाला असून परिसरातील छोटे, मोठे नाले भरून वाहत असल्याने निमडला तलावामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला असून 104 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे तसेच जल स्वराज्य मिशनचे काम मागील अनेक दिवसापासून कोकेवाडा,धानोली रस्त्यावरील नदीवर सुरू असल्याने काम करणारी पोकलॅण्ड रात्री आलेल्या पावसाने नदीमध्ये वाहून गेली....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!