तळोधी बा येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई, महिलांची पाण्यासाठी भटकंती
तळोधी बा.----
अप्पर तहसील तळोधी बा. येथे गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू आहे. मार्च महिन्यातच पाण्याची टंचाई भासत असल्याने उर्वरित महिन्यात काय परिस्थिती निर्माण होईल अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे.
तळोधी बा ग्रामपंचायती अंतर्गत चार ठिकाणाहून पाण्याचा पुरवठा केला जातो.तसेच घोडाझरी तलावातून सुद्धा पाण्याचा पुरवठा केला जातो, कोटी रुपये खर्च करून जलशुद्धीकरण यंत्रना तयार केली आहे. मात्र या योजनेचा कुठेच फायदा होताना दिसत नाही आहे. तळोधी येथील काही वार्डात अनेक दिवसापासून पाणी पुरवठा बंद आहे. तळोधी येथील टीचर कॉलनी येथे अनेक दिवसापासुन पाणी पुरवठा बंद आहे. याबाबत अनेकदा निवेदने सुद्धा दिली गेली मात्र पाण्याचा प्रश्न सुटला नाही. बाम्हनी वार्डात काही भागात पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
अनेक भागात एक गुंडही पाणी येत नाही अशी परिस्थिती आहे. पाण्याच टॅक्स मात्र नियमित वसूल केला जातो. अनेकदा एक ते दोन दिवस पाणीपुरवठा काही तांत्रिक कारणांमुळे बंद असतो. ऐन उन्हाळ्यात जर पाणीपुरवठा नियमित नसेल तर गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे. जर अशीच परिस्थिती राहीली तर गावकरी पाण्यासाठी आंदोलन करणार अशी मागणी जोर धरत आहे.
( ग्रामपंचायतिच्या वतीने चार ठिकाणाहून पाणी पुरवठा केला जातो, मात्र दोन ठिकाणी मोटारपंप जडाल्याने पाणी पुरवठा काही ठिकाणी बंद आहे,परंतु लवकरच पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.-- मिनाक्षी बन्सोड ग्राम विकास अधिकारी तळोधी बा.)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!