कोजबी(चक) येथे भव्य नि:शुल्क रोगनिदान व उपचार शिबीर संपन्न
तळोधी बा.;
येथून जवळच असलेल्या नागभीड तालुक्यातील कोजबी (चक) येथील सरस्वती विद्यालयात भव्य नि:शुल्क रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले.
जनकल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था नवरगाव तथा सरस्वती विद्यालय कोजबी (चक) चे संस्थापक स्व. इंजि. किशोरजी बारापात्रे साहेब यांच्या ६३ व्या जयंतीनिमित्त सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनकल्याण शिक्षण संस्थेच्या सचिव मनीषाताई बारापात्रे तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील सुलोचना बोकाडे, संस्थासदस्य डाॅ. सुधाकर नवलाखे, इंजि. संकेत बारापात्रे,उत्कर्ष बारापात्रे,सरपंच शेवंता भोयर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक इंजि.संकेत बारापात्रे यांनी केले. संचालन सहायक शिक्षक चंद्रशेखर गायकवाड तर आभार मुख्याध्यापक दीपक बोकडे यांनी मानले.
या शिबीराप्रसंगी नागपूर येथील प्रसिद्ध डाॅ. साहीब नय्यर, डाॅ.ओमी भंडारी, डाॅ. खुर्रम, डाॅ.नुपूर नारायणे, डाॅ.श्रेयस गेडाम, डाॅ. विजय देशमाने,डाॅ.नुपूर बोकाडे, डाॅ. कोमल यांनी दंतचिकित्सा व सामान्य रोग यावर रोगनिदान करुन उपचार केले. भव्य महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!