अवैध रेती व दारू ची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केल्याने तस्कराचे धाबे दणाणले.



तळोधी बा : येथील पोलीस स्टेशनचे  ठाणेदार दिनकर शेंडे सध्या रजेवर असल्यामुळें नागभीड येथील पी. एस. आय. आकाश साखरे यांच्या कडे तळोधी बा. पोलीस स्टेशन चा प्रभार असल्याने त्यांनी या परिसरात होत असलेल्या अवैध धंद्यांना आळा बसेल यासाठी सावरगाव वाढोणा मुख्य रोडवर ५ तारखेला रात्री  नाकाबंदी करून देशी दारू ने भरलेल्या चारचाकी रिट्स वाहन क्र. Mh-34-AA6360 या वाहनांची झडती घेतल्यास त्या वाहनांमध्ये देशी दारू च्या १० पेटया जप्त करण्यात आले. वाहनांसह मुदेमाल ३.५०हजार रुपयांचा जप्त केला. तसेच वाढोणा परिसरात रात्रीच्या वेळेस अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रक्टर पकडून पोलीस ठाण्यात जमा करण्यात  आला . या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी व अनेकअवैध धंदे वाढले असून पी. एस. आय. साखरे साहेब यांनी धाड सत्र सुरू केल्याने अवैद्य धंदे करणाऱ्या तस्कराचे धाबे दणाणले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!