गडचिरोली पोलीस भरती निवड यादीवर आक्षेप दाखल - बोगस झाडे कुणबी जातीतील उमेदवारांची निवड

गडचिरोली पोलीस भरती निवड यादीवर आक्षेप दाखल -
बोगस झाडे कुणबी जातीतील उमेदवारांची निवड  


गडचिरोली -  गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2021 ची निवड यादी नुकतीच जाहीर झाली आहे. झाडे कुणबी हे भटक्या जमाती क प्रवर्गात मोडत नसतांना नामसदृश्यतेचा फायदा घेत धनगर समाजातील झाडे या तत्सम जातीचे बोगस प्रमाणपत्राचे आधारे निवड यादीत आल्याने या उमेदवारांवर पोलीस अधीक्षक गडचिरोली यांचेकडे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी आक्षेप दाखल केले आहे. 
          गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2021 ची भरती प्रक्रिया झाली असून निवड यादीत भटक्या जमाती क प्रवर्गातील आरक्षित जागांवर बोगस झाडे कुणबी यांचे नावे आहेत त्यामुळे खऱ्या उमेदवारांनी आक्षेप दाखल केले आहे. मागील 2019 च्या पोलीस भरतीत तीन बोगस झाडे कुणबी उमेदवारांची निवड करण्यात आली त्यावर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी व धनगर संघटनांनी आक्षेप घेऊनही रुजू करून घेण्यात आले व अजुनपर्यँत बोगस उमेदवारांचे जात वैधता प्रकरण पाठविले नाही. 
      निवड यादीतील काही उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र नाकारले असल्याचे, झाडे कुणबी ही वडिलोपार्जीत जात असतांना फक्त झाडे ही जात दाखवून खोटे जातीचे दाखले काढून शासनाची फसवणूक करीत असल्याचा आक्षेप घेणार्यांनी नमूद केले आहे. यावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे लक्ष आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!