निवृत्ती सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न...




वरोरा... जगदीश पेंदाम
 
वनपरिक्षेत्र कार्यालय वडाळा येथे कार्यरत असलेले रतीराम सोनबा चौधरी वनमजूर यांचा सत्कार समारंभ वडाळा वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये घेण्यात आला...
सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थानी पी.एल.चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी ताडोबा, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वि, डी,कामटकर क्षेत्र सहाय्यक काटेझरी, एस, एम, नन्नावरे क्षेत्र  सहाय्यक सोनेगाव, वाय,एम, शेख, क्षेत्र सहाय्यक भांनुसखिंडी,एम,पी, मेडुलकर क्षेत्र सहाय्यक कोलारा, डॉ. सुनील रतीराम चौधरी, ताराबाई रतीराम चौधरी होते.. कार्यक्रमाला सत्कार मूर्ती  रतीराम चौधरी यांच्या सत्कार पि.एल. चव्हाण शाल व श्रीफळ देऊन यांच्या हस्ते करण्यात आला तर सहचारिणी ताराबाई यांचा सत्कार वनरक्षक सोयाम, मीराबाई यांच्या हस्ते शाल,
श्रीफळ, साडी देऊन करण्यात आला. योगायोग असा की या सत्कार समारंभच्या दिवशीच सत्कार मूर्ती यांच्या कुटुंबातील सहचारिणी,  डॉ.मुलगा यांना ताडोबातील तारा नावाच्या वाघिणीचे, पिल्ल्यांचे यावेळी दर्शन झाले...
 वनमजूर चौधरी यांनी जवळपास 35 वर्षे ताडोबाच्या जंगलात मध्ये आपली सेवा दिली असून व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी सत्कार मूर्तीच्या चौधरी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत वन मजूर असताना कमी पगारांमध्ये मुलांना उच्च शिक्षण करून डॉ. एमबीबीएस,एम,डी, बनवत एक मोठ्या प्रमाणात समाजामध्ये महत्वाचे स्थान दिले मान्यवरांनी जीवनावर प्रकाश टाकत त्यावेळी मार्गदर्शन केले तसेच पुढील जीवनाच्या वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.... 
कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनरक्षक धात्रक, जुडे,लटपटे,कोसुरकर,कदम,वघारे,रोखडे, श्रीरामे, सोनुने, वन कुटी मजूर कर्मचारी आदी उपस्थित होते, प्रास्ताविक कामटकर यांनी केले तर सूत्रसंचालन आभार प्रदर्शन कोयचाडे यांनी यावेळी केले.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!