कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका लक्षणीय
चिमूर तालुक्यात ९४.२५ टक्के मतदान
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चिमूर तालुक्यात एकुण ९४.२५ टक्के मतदान झाले असून या सहकार क्षेत्रातील निवडणुकीत महाविकास आघाडीची वज्रमूठ झाल्याने सर्व नेते एकत्र आल्याने निवडणुकीत चुरस वाढली यात जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील नेते संजय डोंगरे हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नेते होते पण या निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पार्टी सोबत गेल्याने आमदार बंटी भांगडीया यांची ताकद वाढली होती परंतु महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र आल्याने आणि चिमूर विधानसभा क्षेत्राचे नवनियुक्त युवा नेते दिवाकर निकूरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकित स्वतः पुढाकार घेऊन उमेदवारी व आपले नशीब आजमावले चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आज लक्षणीय झाली आहे. यात चिमूर तालुक्यात एकूण सहकारी संस्था ४४ होत्या त्यात एकुण मतदार ५३७ होते त्यापैकी ५३४ मददान झाले. ग्राम पंचायतीचे एकुण ७१४ मतदार होते त्यापैकी ६४६ मतदान झाले.व्यापारी व अळते गटात एकूण १२३ मतदार होते त्यापैकी ११६ मतदान झाले.हमाल गटात एकूण मतदार ८७ होते त्यापैकी ८१ मतदान झाले. एकुण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १४६० मतदार होते.एकुण १३७७ मतदात्यानी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक अधिकारी यांच्या कडून मिळाली.२९ तारखेला सकाळी ८ वाजता पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालय ( RTM College chimur ) येथे मतमोजनी होणार आहे.यात उमेदवाराचे नशिब मतपेटीत बंद असून उद्या दिनांक.२९ एप्रिल ला दिलेल्या मतांची मोजणी होणार व विजयी उमेदवार हे वाद्य तसेच संगीताच्या तालावर गुलाल उधळीत विजयाचा जल्लोष साजरा करतील याची तयारी आजपासूनच सुरू झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!