ग्रामीण रुग्णालयात ग्रामजयंती महोत्सव साजरा - सावली तालुका गुरुदेव सेवा मंडळाचा पुढाकार
ग्रामीण रुग्णालयात ग्रामजयंती महोत्सव साजरा - सावली तालुका गुरुदेव सेवा मंडळाचा पुढाकार
सावली - तुकडोजी महाराजांनी गावातील जनता सुखी, गावे स्वयंपूर्ण, स्वावलंबी व्हावी. देशात समता नांदावी हा मंत्र देत ग्रामजयंती सुरु केली. ही ग्रामजयंती सावली तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळाचे वतीने ग्रामीण रुग्णालय सावली येथे साजरी करण्यात आली.
तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळाचे वतीने ग्रामीण रुग्णालय सावली येथे रुग्णांना फळवाटप, भजनाचे, सक्रिय पाठाचे वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी संत मुरलीधर महाराज हरणघाट, वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख, गुरुदेव सेवक जाणीवंत घोडमारे, रमेशजी बोरुले, सुधाकरजी गाडेवार, विनोद बांगरे, मुक्तेश्वर राजूरकर, संजय मेश्राम, प्रभाकरजी गाडेवार, बंडु मेश्राम, डॉ. गुरनुले, दिलीप येलकेवार, भाविकाताई मुळे, इंदिराताई राऊत, रजनी हजारें व गुरुदेव सेवक उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ देशमुख यांना ग्रामगीता भेट देण्यात आली. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा दवाखान्यात देण्यात आल्या.
यावेळी सर्वधर्म समभाव ही राष्ट्रसंतांच्या विचाराची देशालाच नव्हे तर विश्वाला गरज असल्याचे संत मुरलीधर महाराज व मान्यवरांनी मार्गदर्शनात मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद बांगरे यांनी केले. प्रास्ताविक संजय मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन मुक्तेश्वर राजूरकर यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!